सध्या सर्वत्र मोठमोठ्या कलाकारांच्या मुलांना व मुलींना जनतेच्या रागाचा सामना करावा लागत आहे. त्याचे कारण म्हणजे सुशांत सिंग राजपूत यांनी केलेली आत्महत्या हे होय. बड्या कलाकारांच्या मुलांना सहजासहजी चित्रपटात काम मिळते व नवीन कलाकारांना भेटत नाही. यामुळे सुशांत आत्महत्या केली असावी असे जनतेला वाटते.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर हिला आशिकी-2 चित्रपटातून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर तिने बरेच हिट चित्रपट दिले. रेमो डिसूजा दिग्दर्शित एबीसीडी या चित्रपटाच्या तिन्ही सीरिजमध्ये श्रद्धा कपूर ने उत्तम अभिनय केला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये श्रद्धाचा एबीसीडी-3 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
एबीसीडी – 3 या चित्रपटाने जवळपास शंभर करोडचा गल्ला जमविला होता. या चित्रपटात श्रद्धा सोबत प्रभू देवा, वरून धवन, नौरा फतेही हे देखील होते. नौरा फतेही ही एक उत्तम डान्सर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. सत्यमेव जयते चित्रपटातील नौराचे “दीलबर” हे गाणे खूपच गाजले होते.
एबीसीडी-3 ची शूटिंग चालू असताना श्रद्धा आणि नौरा फतेही या दोघींचा सेट वरील डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या वायरल होते. त्या व्हिडिओमध्ये नौरा ही श्रद्धाला तिचे दिलबर गाण्यातील काही स्टेप्स शिकवत असताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघी खूप धमाल करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडिओ :