लॉकडाउन काळात सर्व चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने दूरदर्शन वहिनीने जुन्या लोकप्रिय मालिका परत दाखविण्याचा निर्णय घेतला. सहकुटुंब एकत्र बसून सर्वांनी रामायण, श्री कृष्णा, शक्तिमान या लोकप्रिय मालिकेचा सर्वांनी आनंद घेतला. रामायण आणि श्री कृष्णा या मालिकांनी तर टीआरपी चे सगळे रेकॉर्ड मोडून काढले.

shrikrushna serial news

रामायणात लव कुश पैकी कुश ची भूमिका ही सध्याचा प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याने साकारला होता, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे.परंतु आता श्री कृष्ण मालिकेतून कृष्णाची आणि सुदामाची भूमिका कोण साकारली होती हे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कृष्णाची भूमिका ही देखील स्वप्नील जोशीनेच साकारली होती.

shrikrushna serial news

श्री कृष्णाचा जीवलग मित्र सुदामा हे पात्र “मिहीर राजदा” या अभिनेत्याने साकारले होते. मिहीर राजदा हा तोच अभिनेता आहे, जो सध्या झी मराठीवरील लोकप्रिय मालिका “माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत आनंदची भूमिका साकारतो. विशेष म्हणजे मिहीर ने याच मालिकेत भक्त प्रल्हाद ची भूमिका देखील साकारला होता.

shrikrushna serial news

 

मिहीर आणि स्वप्नील ने मालिका परत सुरू केल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हटले, गुरुकुल मधील शूटिंग वेळी दोघांना तयार होण्यासाठी तब्बल 3 तास लागायचे. एका भागातील झाडावरील तो सापाचा सीन मधील तो साप खरोखर असल्याचे देखील त्यांनी सांगितले. लहापणापासूनच अभिनयात कौशल्य असल्याने आज या दोघांनीही लोकप्रियता मिळवली आहे.

shrikrushna serial news

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *