भारतातील प्रसिद्ध गायक सोनू निगम याने काही दिवसांपूर्वी म्युझिक इंडस्ट्री मधल्या काही लोकांवर निशाणा साधताना असे म्हटले होते की म्युझिक इंडस्ट्रीही फक्त दोन कंपनी चालवतात. त्यावेळी सोनू निगमने कोणाचेही स्पष्ट नाव घेतले नव्हते. परंतु नव्या व्हिडिओमध्ये सोनू निगमने टी सीरिज कंपनीचे मालक भूषण कुमार यांचे नाव घेत सरळ त्यांना धमकी दिली आहे.
सोनू निगमचे धमकी देताना सरळ म्हटले आहे की माझ्याशी पंगा घेतलास तर मरीना कुंवरचा तो व्हिडीओ माझ्या यूट्यूब चैनल ला शेअर करेन. व्हिडिओच्या शेवटी सोनू निगम ने “भूषण कुमार, आता मला तुझे नाव घ्यावेच लागेल आणि आता तू “तू”च्याच लायकीचा आहेस. तू चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला आहेस. तू विसरलास ज्यावेळी तू माझ्या घरी येऊन भाई हे अल्बम कर, भाई दीवाना चे गाणे गा, भाई मला स्मिता ठाकरे यांच्याशी भेट घालून दे, भाई बाळासाहेब ठाकरे यांची भेट घालून दे, भाई अबु सलेम पासून वाचव मला” असे सुनावले.
पुढे सोनू ने भूषण कुमारला धमकावताना असे म्हटले, “माझ्या नादी लागू नकोस, मरिना कंवर आठवते ना? तिने काय म्हटले होते हे मला माहिती नाही पण सगळं मीडियाला माहिती आहे. तिचा व्हिडिओ माझ्यापाशी आहे जर तू माझ्यासोबत पण घेतला तर तो व्हिडिओ माझ्या यूट्यूब चैनल ला धुमधाम ने टाकेल.”
मरिना कुंवर ही एक मॉडेल आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. जग्गू दादा, शपथ, सीआयडी, आहट अशा अनेक मालिका तिने केली आहे. 2018 साली मरिना ने साजिद खान आणि भूषण कुमार यांच्यावर शारीरिक शोषण केल्याचे आरोप लावले होते. #Mitoo अभियान अंतर्गत आरोप लावताना मरीना ने भूषण कुमार ने व्हिडिओ मध्ये काम देण्याच्या कारण सांगून त्यांच्या घरी बोलाविले होते आणि वाईट वागणूक केल्याचे तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..