सुशांत सिंग राजपूत या लोकप्रिय अभिनेत्याने केलेली आत्महत्या मन हेलावून टाकणारी अशीच आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जाण्याने दुःख होत आहे. सुशांत सोबत नाव जोडले गेलेल्या या काही अभिनेत्रींना देखील मोठा धक्का बसला आहे. परंतु त्यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट न केल्याने काही लोक त्यांच्यावर ताशेरे उडताना दिसत होते.
सुशांत याची सध्याची अत्यंत जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती तिने रडून रडून स्वतःचे हाल करून घेतले आहेत, असे सूत्राच्या द्वारे माहिती मिळते. शवविच्छेदना साठी सुशांत ज्या दवाखान्यात नेण्यात आले तिथे त्याच वेळी रिया पोहचली होती. सुशांतचे पहिले प्रेम अंकिता लोखंडे ही देखील या धक्यातून आणखीन सावरली नाही.
ज्यावेळी अंकिताला सुशांतच्या बातमीबद्दल कळालं तेव्हापासून अंकिता देखील सारखे रडत आहे. अंकिता ही सशांच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाचे सांत्वन करून आली आहे. ती ज्यावेळी घरात जात होती त्यावेळी तिला व्यवस्थित चालता देखील येत नव्हते. यावरूनच तिने स्वतःचे किती हाल करून घेतले आहेत, हे समजते.
अंकिता आणि रिया या दोघींनी सोशल मीडियावर जरी काही पोस्ट केल्या नसल्या तरी त्यांना सुशांतच्या जाण्याने खुपच दुःख झाले आहे. सत्य परिस्थिती समोर येण्याअगोदर कोणावरही राग काढणे हे चुकीचे आहे. सोनम कपूर ने देखील ट्वीट करून या दोघींवर आरोप न करण्याचे फॅन्सना संदेश दिला आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.