सुशांत सिंग राजपूत यांनी केलेल्या आत्महत्येनंतर देशात सर्वत्र अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. सुरुवातीला ही आत्महत्या नसून यांचा खून केला आहे अशी शंका वाटत होती. परंतु पोलिसांनी आणि डॉक्टरांनी ही आत्महत्याच होती हे स्पष्ट केले आहे. परंतु सुशांतने आत्महत्या कोणत्या कारणाने केली याच्या पोलीस आणखीनही तपास करीत आहेत.

sushant ankita lovestory

मुंबई पोलीस सुशांत संबंधित प्रत्येक व्यक्तींची चौकशी करताना दिसत आहेत. सुशांत ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती अंकिता लोखंडे यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. काही दिवसांपूर्वी रिया सुशांत सोबत राहत असल्याने तिच्याकडून काही महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच पोलिसांनी मनोविकार तज्ञ केरसी चावला यांना विचारपूस केल्यानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

shing rajput death news

“सुशांत गेल्या वर्षभरापासून निराशेत होता व सुशांत सहा महिन्यापूर्वी मला भेटला होता. संपूर्ण रात्र मला झोप येत नाही मनात कसलेही विचित्र विचार येत आहेत असे त्यांनी सांगितले होते. त्याला रिया चक्रवर्ती चे वागणे आवडत नव्हते व अंकिता लोखंडे ची तो नेहमी आठवण काढत होता. अंकिता सोबत ब्रेकअप करून त्याला पश्चाताप होत होता,” असे डॉक्टरांनी सांगितले.

sushant

पोलिसांनी या अगोदरच रियाची अकरा तास चौकशी केली होती. तसेच सुशांतच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी अंकिता त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी पोलिसांनी तिची देखील चौकशी केली होती. सुशांतच्या मृत्यूचा अंकिताला खूप मोठा धक्का बसला आहे व त्याच्या आठवणीत नेहमी रडत आहे असे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने सांगितले.

sushant

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *