बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मित्राकडून एक माहिती समोर आली आहे. सुशांत लवकरच त्याच्या मित्रासोबत फिल्म तयार करणार होता. सुशांतचा अत्यंत जवळचा मित्र संदीप सिंग याने त्याबद्दल खुलासा केला आहे. संदीपने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर पोस्ट करून या चित्रपटाविषयी अनेक खुलासे केले आहेत.
सुशांत हा ‘वंदे भारतम’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये निर्माता म्हणून पदार्पण करण्याच्या तयारीत होता. संदीप सिंगने आपल्या इंस्टाग्राम वर पोस्ट करताना ‘वंदे भारतम’ चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. या पोस्टर मध्ये सुशांत चा फोटो दिसत आहे. चित्रपट मधून संदीप सिंग हा देखील दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार होता. संदीपने या अगोदर ‘अलीगड’, ‘सरबजीत’ आणि ‘भूमि’ या मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
शनिवारी संध्याकाळी याबद्दल माहिती देताना संदीपने इन्स्टाग्रामवर लिहिले की, “तू मला वचन दिले होते की आपण, बिहारी भाऊ एक दिवस या इंडस्ट्रीवर राज्य करू आणि तुझ्या आणि माझ्यासारख्या स्वप्नाळू तरुणांना प्रेरणा देतील आणि त्यांची सपोर्ट सिस्टम बनवतील. ”
या नंतर संदीपने पुढे लिहिले की, ‘तू मला वचन दिले होतेस की तू माझ्या बरोबर एक दिग्दर्शक म्हणून सुरू करेल, तू गेल्यामुळे आता मी पूर्णपणे तुटलो आहे. आता मला सांगा की मी हे स्वप्न कसे पूर्ण करेन. मी तुम्हाला वचन देतो की मी हा चित्रपट सुरू करेन आणि लाखो लोकांना प्रेरणा देणाऱ्या प्रिय सुशांतसिंग राजपूत यांच्या स्मृतींना ही श्रद्धांजली ठरेल आणि काहीही शक्य आहे” अशी आशा व्यक्त केली.