सुशांत सिंग राजपूत यांनी केलेल्या आत्महत्येमुळे फॅन्स सोबत अनेक दिग्गज कलाकारांना देखील धक्का बसला आहे. सुशांतच्या कुटुंबाला व त्याच्या वडिलांच्या गावातील सर्व लोकांना हा मोठा काळाचा आघात होता.

sushant rajput

 

सुशांतचे मुंबईत ज्यावेळेस निधन झाले त्यावेळेस पटना मध्ये राहणाऱ्या त्याच्या वडिलांसाठी हा मोठा धक्का होता. बिहार मधील मलडीहा तसेच पटनाच्या राजीवनगर भागातील सर्व लोक सुशांतची बातमी ऐकताच रडताना दिसत होते. सुशांतचा चुलत भाऊ अमरिंदर सिंग यांची पत्नी सुद्धा यांना मोठा धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले.

sushant rajput

सुद्धा या सुशांतची वहिनी होत्या व त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. ज्यावेळी सुशांतचे मुंबईमध्ये अंत्यसंस्कार चालू होते, त्यावेळी पटना मध्ये सुशांतच्या वहिनीने देखील जीव सोडला. यामुळे सुशांतच्या परिवारावर आणखीन जास्त दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील दोघांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

sushant rajput

सुशांतच्या आत्महत्येमुळे परिवारातील सदस्यांना धक्का बसणे सहाजिकच आहे. परंतु उत्तर प्रदेशमधील बरेली शहरात एका दहावीत शिकणाऱ्या मुलाने सुशांत आत्महत्या करू शकतो तर मीही करू शकतो, पत्राद्वारे लिहीत जीवन यात्रा संपविली. त्या मुलाला सर्वजण तृतीयपंथी म्हणून चिडवत असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *