अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी केलेल्या आत्महत्या आता जवळपास एक आठवडा झाला आहे. परंतु आणखीनही कोणालाही विश्वास बसत नाहीये व काहीजण अजूनही या धक्क्यातून सावरले नाहीत. इतक्या दिवसानंतरही सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह तसेच कायम आहेत.

sushant rajput

सुशांत च्या निधनानंतर अनेक व्हिडिओज व्हायरल होत गेल्या. त्याचा श्वान फज याच्यासोबतच्या काही व्हिडिओज आणि फोटोज् देखील व्हायरल झाल्या होत्या. सुशांत च्या जाण्याने फज खूपच दुःखात असून त्यांने खाणे पिणे देखील बंद केले आहे, अशी बातमी होती. प्रत्येक ठिकाणी फज हा सुशांत ला शोधत असतो व मोबाईल मध्ये त्याचा फोटो पाहून रडत असतो.

कालपासून याच फज बद्दल एक बातमी सोशल मीडियावर पसरली होती. खाणे पिणे सोडून दिल्याने या फज चे निधन झाले, अशी बातमी काही लोकांनी पोस्ट केली होती. परंतु सुशांत च्या जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे की फज हा जिवंत आहे. त्यामुळे फज च्या मृत्यूची बातमी ही एक अफवाच आहे.

sushant rajput latest

 

सोफ्यावर एका मृत अवस्थेत पडलेला एक तो श्वान फज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फज हा सुशांतच्या पावना हाऊस येथे असून सध्या तो एकदम ठिक असल्याचे सांगण्यात येत आहे. फज सोबत आणखीन चार श्वान आहेत व ते चारही सुरक्षीत आहेत.

 

माहिती आवडली तर शेयर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *