14 जून च्या दुपारी साडेबारा वाजता सुशांत सिंग राजपूत याने केलेल्या आत्महत्येमुळे एकच खळबळ माजली आहे. यशाच्या शिखरावर असताना, सर्व काही सुरळीत असताना सुशांतने असा का निर्णय घेतला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याच्या जाण्याने एक उत्तम कलाकार गमावला अशाच सर्वांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
कोणत्याही गोष्टीची कमी नसल्याने सुशांत हा आत्महत्या कसा करू शकतो, या शंकेने पोलीस कसून तपासणी करत आहेत. सुशांत गेल्या सहा महिन्यापासून नैराश्यात असल्याने तपासणी करीत होता. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून त्याने औषधे घेतली नसल्याचे सुत्रांकडून कळते. सुशांतच्या मोबाईलची तपासणी केली असता पोलिसांनी शेवटच्या काही कॉल बद्दल चौकशी करीत आहेत.
सुशांतने बोललेल्या शेवटच्या 10 दहा व्यक्तींची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. परंतु त्यात शेवटचे दोन कॉल सुशांत त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि अत्यंत जवळचा मित्र महेश शेट्टी यांना केला होता.
सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती ही चांगलीच चर्चेत आली आहे. अनेक फॅन्स विनाकारण तिच्यावर राग व्यक्त करताना दिसत आहेत. या कारणाने तिने इंस्टाग्राम वरील कमेंट बॉक्स प्रायव्हेट करून ठेवला आहे. तर दुसरी व्यक्ती महेश पांडे याचीदेखील पोलीस चौकशी करीत आहेत.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा..