2020 या साली बॉलीवूड चित्रपट सृष्टीत एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. इरफान खान, ऋषी कपूर, वाजीद खान यांच्या नंतर बॉलीवूडला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. सध्याचा आघाडीचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
एक उत्तम कलाकार तसेच अभिनय कौशल्य असणारा या अभिनेत्यांने अल्पावधीतच आपले नाव लोकप्रिय केले होते. पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणाऱ्या या अभिनेत्यांनी नंतर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. “काई पो चे” या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये त्याने पदार्पण केले.
शुद्ध देसी रोमान्स, पिके, धोनी द अनटोल्ड स्टोरी, छिछोरे असे एका पेक्षा एक हिट सिनेमा त्याने बॉलीवुड दिले होते. त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. वांद्रे येथील त्याच्या घरी मित्र असताना त्यांनी एका रूममध्ये पंख्याला गळफास घेतला. मित्रांनी दरवाजा तोडले त्यावेळेस त्यांना ही गोष्ट कळाली. त्याच्या रूममध्ये डिप्रेशन साठीच्या काही औषधे सापडले आहेत.
यावरून नक्कीच तो निराशेत होता असे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार असे ऐकण्यात येत आहे की त्याचे आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती चित्रपट या दोघातील संबंध काहीसे ठीक नव्हते. काहीही असले तरी सुशांत सिंग राजपूत यांनी नैराश्यातून आत्महत्या केली हे मात्र खरे आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा