सगळे जग कोरोनाव्हायरस सोबत लढत असताना बॉलीवूड मधून एका पाठोपाठ एक मोठे कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. ऋषी कपूर, इरफान खान, साजिद खान अशा दिग्गज अभिनेत्यांच्या निधनानंतर सध्याचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या करून आणखीन मोठा धक्का दिला आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सुशांत ने आत्महत्या केली हे सिद्ध झाले आहे. सुशांत आणि त्याची काही जवळचे मित्र यांनी आदल्या रात्री एकत्र जेवण मग गप्पागोष्टी केल्या होत्या. सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी आपल्या एका बहिणीला कॉल केला होता. त्यानंतर सुशांतने दहा वाजता ज्यूस घेऊन रूम मध्ये गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत शेवटचा कॉल त्याचा अत्यंत जवळचा मित्र अभिनेता महेश शेट्टी याला कॉल केला होता. परंतु महेश ने त्याचा कॉल उचलला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे अनेक फॅन्स महेश ने कॉल नाही उचलल्याने नाराज आहेत. हा कॉल नेमके किती वाजता केला होता, हे मात्र आणखीन उघड करण्यात आले नाही.
एकता कपूरच्या “किस देश मे है मेरा दिल” या सुशांत सिंग च्या पहिल्या टीव्ही मालिकेत महेश ने एकत्र काम केले होते. तेव्हापासून सुशांत महेशला आपल्या भावासारखा मानतो. मे महिन्यात 21 तारखेला महेश च्या वाढदिवशी सुशांत ने महेशला शुभेच्छा वाटेत असलेली फोटो पोस्ट केली होती. त्याने “हॅप्पी बर्थडे मेरी जान” असे कॅप्शन देखील टाकले होते.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.