काही दिग्गज बॉलीवुड अभिनेता गेल्याच्या धक्यातून सावरत नाही तोपर्यंत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केलेल्या आत्महत्येने बॉलिवूडला धक्का बसला आहे. सुशांत ने त्याच्या जीवनातील अनेक चढ-उतारांचा सामना करत कोणताही फिल्मी पाठिंबा नसताना स्वतःची ओळख निर्माण केली. “पवित्र रिश्ता” या टीव्ही मालिकेतून प्रसिद्धी मिळवणाऱ्या या अभिनेत्यांने नंतर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. “काई पो चे” या पदार्पणातील चित्रपटाने तो प्रसिद्ध झाला.

sushant sing rajput latest

2002 साली वयाच्या 16 व्या वर्षीच त्याने स्वतःच्या आईला गमविले होते. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यात असल्याने डॉक्टरांच्या संपर्कात होता. त्याच्या रूममध्ये डिप्रेशन साठीच्या काही औषधे सापडले आहेत. त्यात 4 दिवसापूर्वी त्याच्या आयुष्यातील एका जवळच्या व्यक्ती ने आत्महत्या केली होती.

sushant sing rajput latest

सुशांत याची एक्स मॅनेजर दिशा सलियन हिने 5 दिवसापूर्वीच मलाड येथील एका बिल्डिंग वरून उडी मारून आत्महत्या केली होती. यावर सुशांत इंस्टाग्राम स्टोरी द्वारे “एक खूप दुःखद घटना आहे, तिच्या मित्रपरिवारा च्या दुःखात मी सहभागी आहे, तुझ्या आत्म्याला शांती लाभो”. अगोदरच नैराश्यात असणाऱ्या सुशांत ला या घटनेने आणखी खचून टाकले असणार.

sushant sing rajput latest

सुशांत सिंग याची इंस्टाग्राम ची शेवटची पोस्ट मधून देखील त्याला कोणते तरी दुःख होते असे दिसते. आपल्या आईचा फोटो टाकत त्याने असे कॅप्शन लिहिले. “डोळ्यातील अश्रूंनी भूतकाळ अस्पष्ट आणि अदृष्य होत आहे. अपूर्ण स्वप्ने हसत आहेत. त्याच वेळी, प्रारंभिक जीवन दोघांमध्ये वाटाघाटी करत आहे, मां”

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *