टेलिव्हिजन वरील मालिकेतील काही मालिका व त्या मालिकेतील काही पात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात. नव्वदच्या दशकात दूरदर्शन ह्या वाहिनीवरील काही मालिका प्रेक्षकांना आजही आठवतात. त्यात रामायण, श्री कृष्णा, शक्तिमान, शका लका बूम बूम अशा अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
सध्या कोरोनाची भीषण परिस्थिती असल्याने सर्व मालिकांचे शुटींग बंद आहे. या कारणाने दूरदर्शनने त्यांच्या गाजलेल्या प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. 3 मे पासून दूरदर्शनवर “श्री कृष्णा” ही मालिका सुरू झाली. रामानंद सागर प्रस्तुत या मालिकेत कृष्णाचा अभिनय “स्वप्निल जोशी” तर राधाचा अभिनय “श्वेता रस्तोगी-चौधरी” यांनी केला होता. या जोडीला आजही ही सर्वोत्तम राधा कृष्ण ची जोडी म्हणून प्रेक्षक ओळखतात.
स्वप्निल जोशी याचे नंतर यशस्वी करीयर सुरू झाले. परंतु श्वेता रस्तोगी त्या मालिकेनंतर जास्त प्रसिद्धी मिळवू शकली नाही. परंतु ती सध्या वयाच्या 45 मध्ये देखील पूर्वी पेक्षा सुंदर दिसत आहे. फॅन्स च्या आग्रहास्तव या दोघांनी इंस्टाग्राम वर लाईव्ह येऊन गप्पा देखील मारल्या.
श्री कृष्णा मालिकेत येण्यापूर्वी श्वेता ने हिंदी चित्रपट “खून भरी मांग” या हिंदी चित्रपटात रेखाच्या मुलीचे पात्र साकारले होते. तसेच तिने “परिंदा” व “किशन कन्हैया” या चित्रपटात देखील काम केले होते. श्वेताने नंतर अनेक हिंदी मालिकेत देखील काम केले होते. सोशल मीडियावर लाईव्ह येऊन तिने स्वप्निल सोबत मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.