बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनय कौशल्याने कमी कालावधीतच स्वतःची ओळख बनवणारी अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सोशल मीडियावरील एका पोस्टवरून चर्चेत आहे. कलाकारांना फॅन्सनी प्रपोज करणे किंवा प्रेम व्यक्त करणं हे साधारण गोष्ट आहे. परंतु जेव्हा एक कलाकार दुसऱ्या कलाकारावर प्रेम व्यक्त करतात त्यावेळी तो चर्चेचा विषय ठरतो.
तापसी पन्नू या अभिनेत्रीने ऋतिक रोशन किती प्रेम आहे हे का पोस्ट द्वारे सांगितले. तापसी पन्नू ही सध्या आपल्या बहिणीसोबत राहत आहे. तिने तिची बहीण शगुन पन्नू सोबत ऋतिक रोशनचा “कहो ना प्यार है” हा चित्रपट परत एकदा टीव्हीवर पाहिला. त्यानंतर दोघी बहिणींनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये चित्रपट पाहताना चे फोटो पोस्ट करत ऋतिक रोशन वर किती प्रेम आहे हे सांगितले.
तापसी ने फोटो मध्ये, “आमच्या घरात ऋतिक रोशन बद्दल च्या गोष्टी कधीच संपत नाहीत. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फक्त त्यांच्याबद्दलच चर्चा होते”, असे लिहिले. या पोस्टला उत्तर देताना ऋतिक रोशन ने देखील त्याच्या भावना व्यक्त केल्या.
रितिक ने तापसी ची ती पोस्ट त्याच्यात स्टोरी मध्ये शेअर करताना असे लिहिले, “एकदम बरोबर आहे, ही झाली ना गोष्ट. तुमच्या प्रशंसेने माझ्या चेहऱ्यावर हास्य आणले.” स्टोरीस ना पाहून ऋतिक आणि तापसी यांच्या फॅन्समध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा