भारताने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांनी जगभरातील अनेक रेकॉर्ड प्रस्तापित केली आहेत. एकता कपूरच्या कहाणी घर घर की, क्यूंकी सास भी कभी बहू थी अशा काही मालिकांनी टीआरपी चे अनेक रेकॉर्ड मोडून काढले. सध्या सोनी सब वाहिनीवरील “तारक मेहता का उलटा चष्मा” ही मालिका पूर्ण घराघरात पोहोचली आहे.
तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका 28 जुलै 2008 ला सुरू झाली. तेंव्हा पासून आजपर्यंत मालिकेने नेहमीच यश मिळवले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आपापल्या भूमिकेला योग्य न्याय देतात. गोकुळधाम पुरुष वर्ग, महिला मंडळ व टप्पू सेना अशी सर्वच पत्र लहानपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आवडू लागले. परंतु मालिकेतील जेठालाल गडा यांच्या वडिलांचा अभिनय करणारे चंपकलाल गडा म्हणजेच “अमित भट” बद्दल एक गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे.
मालिकेत 75 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीचे अभिनय करणारे अमित भट हे खऱ्या आयुष्यात मात्र खूप कमी वयाचे आहेत. त्यांचे खरे वय 48 असून ते जेठालाल पेक्षा चार वर्षांनी लहान आहेत. वयाप्रमाणे मालिकेत त्यांचे दाखविलेले टक्कल हे देखील खोटे आहे.
अमित भट यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1972 रोजी झाला तर जेठालाल ची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांचा जन्म 26 मे 1968 रोजी झाला होता. इतके दिवस मालिकेत जेठालालचे वडील म्हणून प्रेक्षकांनी अमित भट यांना खरोखरच वृद्ध समजले. परंतु त्यांचे हे खरे वय जाणून प्रेक्षक नक्कीच आश्यर्य चकित होतील.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.