व्हिडिओ साठी खाली पाहा
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने महाराष्ट्रभरातून प्रेम मिळविणाऱ्या अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने अल्पावधीतच प्रसिध्दी मिळवली. झी मराठीवरील “होणार सून मी या घरची” या मालिकेतून तेजश्री घराघरात पोहोचली. एक आदर्श सून म्हणून तिच्याकडे प्रेक्षक पाहू लागले.
झी मराठीवर अगबाई सासूबाई या मालिकेत देखील शुभ्रा नावाचे सुनेचे पात्र साकारताना दिसून आली होती. परंतु, तेजश्री आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. तेजश्री प्रधान आता बॉलीवुड मधील एका चित्रपटात दिसणार आहे. बबलू बॅचलर या तिच्या पदार्पणातील चित्रपटात शर्मन जोशी अभिनेता म्हणून दिसणार आहे.
20 मार्च 2020 रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु देशात लॉकडाउन चालू झाल्याने चित्रपटाला प्रदर्शीत करण्यात आले नाही. परंतु लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तेजश्री ने शर्मन जोशी सोबत किसिंग सीन केल्याचे ट्रेलर मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे तेजश्री च्या फॅन्स मध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
पाहा व्हिडिओ :
तेजश्री प्रधान हिने ती सध्या काय करते?, लग्न पहावे करून अशा काही मराठी चित्रपटात देखील यापूर्वी काम केले आहे. परंतु, आपल्या अभिनय कौशल्याने बॉलीवुड मध्ये ती आता पदार्पण करताना दिसेल. छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकणारी तेजश्री चित्रपटातून देखील फॅन्सना आनंदी ठेवेल हीच अपेक्षा.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..