टेलिव्हिजनवर अनेक नाना प्रकारच्या सिरीयल, रियालिटी शो, कॉमेडी शो येत असतात. परंतु त्यातील काहीच यशस्वी होतात व खूप दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतात. झी मराठी वाहिनीवरील “चला हवा येऊ द्या” या कॉमेडी शो ने यशाची अनेक शिखरे गाठली. या शोमधील संगीतकार तुषार देवल त्याच्या पत्नी बद्दल आज आपण जाणून घेऊयात.
चला हवा येऊ द्या शो मध्ये डॉ. निलेश साबळे अधून मधून तुषार देवल वर कॉमेडी करताना दिसत असतो. तुषार देवल सुद्धा कधीकधी जोक करताना दिसत असतो. तुषार मध्ये अभिनय कौशल्य आहे हे त्याच्या अभिनयावरून दिसून येते. तुषारची पत्नी स्वाती ही देखील अभिनय क्षेत्रात आहे.
स्वाती देवल हिने झी मराठीच्या 2010 मधील फुबाईफु या शो मध्ये सहभाग नोंदविला होता. त्यात तिने अभिनेता संदीप पाठक सोबत काम केले होते. विशेष म्हणजे या शो चे निलेश साबळे यांनी सूत्रसंचालन केले होते. स्वातीने कळत नकळत, कुंकू, वादळवाट, विवाहबंधन, पुढचं पाऊल, पारिजात अशा अनेक मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. तसेच तिने “वन टू का फोर” या नाटकात देखील उत्तम अभिनय केला आहे.
चला हवा येऊ द्या मध्ये नशीब आज मावणाऱ्या तुषार हा या शो चा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्याने पत्नी स्वाती सोबत काही वर्षापूर्वीच बोरवली येथे फ्लॅट घेतला असल्याची चर्चा झाली होती. दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव स्वराध्य आहे. तुषार आणि स्वातीला भावी आयुष्यासाठी मर्द मराठी तर्फे खूप खूप शुभेच्छा.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा..