कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशभर संचारबंदी चालू असल्याने सर्वांची कामे बंद आहेत. अशातच कलाक्षेत्रातील सर्व कलाकार देखील शूटिंग बंद असल्याने घरातच बसून आहेत. परंतु हे कलाकार घरी बसून देखील आपल्या फॅन्सना करमणूक करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
कोठारे घराण्याची सून अभिनेत्री “उर्मिला कोठारे” व डान्स कोरिओग्राफर “फुलवा खामकर” यांनी आपल्या फॅन्स साठी एक उत्तम कला सादर केली आहे. या दोघींनी स्वतःच्या घरात राहून एक उत्तम डान्स चे सादरीकरण केले आहे. दोघींच्या डान्स व्हिडिओ चे सर्वत्र कौतुक होत असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या डान्स साठी एक महिन्यापासून तयारी चालू होती असे उर्मिला ने सांगितले. या डान्सला फुलवा खामकर यांनी कोरिओग्राफी केली आहे. फुलवा खामकर या एक उत्तम डान्स कोरिओग्राफर असून त्यांनी बॉलीवुड चित्रपट हॅपी न्यू इअर या चित्रपटासाठी देखील कोरिओग्राफी केली आहे. फॅन्स कडून देखील या डान्स साठी उत्तम प्रतिक्रिया आल्या आहेत.
पाहा व्हिडिओ..
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.