2020 हे वर्ष बॉलिवूड इंडस्ट्री साठी अत्यंत वाईट असेच जात आहे. एप्रिल च्या शेवटी बॉलिवूड ने ऋषी कपूर आणि इरफान असे दिग्गज कलाकार गमाविले होते. या धक्क्यातून तून फॅन्स सावरले नाही तोपर्यंतच आणखीन एका मोठ्या कलाकाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने अनेक कलाकारांना चित्रपटसृष्टीत आणून मोठे बनवण्यास मदत केली. त्यात “साजिद-वाजिद” या म्यूजिक कंपोजरच्या जोडीचा देखील समावेश आहे. या दोघांनी सलमान खान साठी अनेक गाणी कंपोज केली व ती प्रत्येक गाणी हिट देखील झाली. प्यार किया तो डरना क्या पासून ते दबंग 3 असे अनेक चित्रपटात एकापेक्षा एक हिट गाणी दिली.
बॉलिवूडला यापुढे या दोघांना एकत्र पाहता येणार नाही. कारण, या जोडीपैकी “वाजीद खान” यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. वाजीद खान यांचा वयाच्या 39 व्या वर्षी आज दिनांक 1 जून रोजी पहाटे अकाली निधन झाल्याने बॉलीवुड मध्ये शोककळा पसरली आहे.
हुड हुड दबंग, सुरेली आंखियो वाले, धडांग ढंग, माशा आल्लाह, तेरा ही जलवा असे अनेक एका पेक्षा एक हिट गाणी वाजीद ने गायली आहेत. Dabang-3 चित्रपटासाठी गायलेले गाणे हे त्यांचे शेवटचे गाणे होते. प्रसिद्ध गायक सोनू निगम याने देखील त्याच्या मृत्यू बद्दल दुःख व्यक्त करताना माझा भाऊ गेल्याचे म्हटले आहे.
माहिती share नक्की करा.