गेल्या काही महिन्यापासून काही मराठी कलाकारांनी साखरपुडा तर काहींनी लग्न केल्याचे दिसून आले. यामध्ये नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपानकर, तेजपाल वाघ, कार्तिकी गायकवाड यांनी आपल्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर दिली. आता मराठी अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने देखील प्रियकराचा फोटो शेयर करून प्रेम व्यक्त केले आहे.

abhidnya bhave in love news


अभिज्ञाने तुला पाहते रे, जुळून येती रेशीमगाठी अशा लोकप्रिय मालिकेतून तसेच, चला हवा येऊ द्या या शो मधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. अभिज्ञाने मेहुल पै या व्यक्तीसोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. तीने मेहुल सोबतचा एक फोटो शेयर केला. ज्यात तिने त्या फोटोवर “सदैव आभारी” असे कॅप्शन टाकून समोर हार्ट टाकले आहे. अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्याचे दिसून आले.

abhidnya bhave in love news


मेहुल पै हे एक ऑपरेशन मॅनेजर असून ते “क्लासवर्क इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड” मध्ये गेल्या 12 वर्षापासून कार्यरत आहेत. ते इव्हेंट मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट याबद्दलचा भार सांभाळत असतात. त्यांनी डी जी रूपारेल महाविद्यालयातून फिलॉसॉफी विषयातून पदवी घेतली आहे.

abhidnya bhave in love news

अभिज्ञा व मेहुल या दोघांनी यापूर्वीही एकमेकांच्या वाढदिवशी स्पेशल शुभेच्छा दिलेल्या पोस्ट केल्या होत्या. मेहुलच्या वाढदिवशी अभिज्ञाने “हॅप्पी बर्थडे स्पेशल” असे कॅप्शन टाकले होते. त्यावेळी दोघात प्रेम आहे की नाही हे स्पष्ट नव्हते. आता स्वतः अभिज्ञा ने प्रेमाची कबूली दिली आहे. दोघांना “मर्दमराठी” तर्फे भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *