झी मराठी वरील सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या “अग्गबाई सासुबाई” या मालिकेतील बबड्या नावाच्या पात्राला सर्व स्तरातून टीका होत आहे. या बबड्याच्या वागणुकीवर सर्वच जण संताप व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे आता बबड्यावर सोशल मीडियावर मिम्स बनविले जात आहेत. हे मिम्स वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

aggabai sasubai memes


बबड्याचा अभियन करणारा अभिनेता आशुतोष पत्की याला मालिकेत एक लाडवलेला मुलगा दाखविण्यात अाला आहे. बबड्या हा घरातील सर्वांना त्रास देताना दिसून येतो. त्याची पत्नी शुभ्रा त्याच्या या स्वभावाला कंटाळून घर देखील सोडून जायला निघाली होती.

aggabai sasubai memes


बबड्या सोबतच त्याच्या आईचा अभिनय करणाऱ्या निवेदिता सराफ यांच्या आसावरी या पात्राला देखील प्रेक्षकांकडून नापसंती दाखविण्यात येत आहे. बबड्या इतक्या चूका करीत असताना देखील आसावरी त्याच्या चुकांवर पांघरूण घालताना दिसून येते. त्यामुळे तिच्यावर “माझा छकुला” चित्रपटापासून लेकराना नीट सांभाळता येत नसल्याचे जोक बनवले जात आहेत.

aggabai sasubai memes

aggabai sasubai memes

मालिकेवर सोशल मीडयावरून होत असलेल्या मिम्स मुळे मालिकेत बदल झालेले दिसतील अशी अपेक्षा करू. एका प्रोमो नुसार आसावरी यापुढे बबड्याला धडा शिकवत असताना दिसणार आहे. परंतु या मिम्स मुळे नेटकऱ्यांची करमणुक होत आहे हे नक्की.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *