झी मराठीवरील प्रत्येक मालिकेमध्ये नेहमीच काही ना काही बदल करण्यात येतच असतो. या बदलांमुळे मालिकेच्या टीआरपी मध्ये सुधारणा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. लॉकडाऊन नंतर आता परत शुटींग सुरू झाल्यामुळे येत्या 13 जुलैपासून झी मराठीच्या सर्व मालिकांचे प्रसारण करण्यात येणार आहे. त्यातच झी मराठी वरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत नेमका काय बदल घडून येणार आहे, ते पाहुयात.

अग्गबाई सासुबाई या लोकप्रिय मालिकेत सासुबाईचा अभिनय करणाऱ्या “निवेदिता सराफ” म्हणजेच असावरी या मालिकेत भोळीभाबडी दाखविण्यात आली होती. तीचा मुलगा बबड्या याच्या चुका नेहमीच माफ करताना तीला दाखविण्यात आले. परंतु यापुढे आसावरी या पात्राच्या स्वभावात बदल झालेला दिसून येणार आहे. आसावरी यापुढे बबड्याला चांगलाच धडा शिकविताना दिसणार आहे.

शनया आणि आसावरी दोघी बदलणार, ही बातमी ऐकून प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. शनया हे पात्र आता पूर्वीची अभिनेत्री रसिका सुनील साकारणार हे तर सर्वांनाच माहिती आहे.परंतू आसावरी हे पात्र “निवेदिता सराफ” याच साकारणार असून त्यांच्या स्वभावात बदल झालेला दाखविणार आहेत.
मालिका यापुढे किती रंजक होणार हे येणारा काळच सांगेल. परंतु एका प्रोमोमध्ये असावरी बबड्याला असे म्हणताना देखील दाखविले आहे की, “मी शुभ्राची सासू नसून आता तुझी सासू आहे.” त्यामुळे भोळी आसावरी ला कंटाळलेल्या फॅन्स साठी हि एक मेजवानीच असणार आहे.
माहिती आवडली तर शेयर करा..