amithabh bacchan news

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सिनेसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून फॅन्स ना त्याबद्दल माहिती दिली व ही गोष्ट वाऱ्यासारखी संपूर्ण जगभरात पसरली.

amitabh bacchan news
<– Composite Start –>


अमिताभ बच्चन हे मागील काही दिवस “कोन बनेगा करोडपती” या शोच्या शूटिंग च्या तयारीत होते. त्यादरम्यान त्यांचा अनेक व्यक्तींशी संपर्क झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अमिताभ नंतर अभिषेक बच्चनचा देखील कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना टेस्ट करण्यास बच्चन कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

amithabh bacchan news
<– Composite Start –>


बच्चन कुटुंबियातील सर्वांनीच खबरदारी म्हणून कोरोनाची टेस्ट केली. रात्री उशीरा सर्वांचे रिपोर्ट आले. रिपोर्टनुसार अमिताभ व अभिषेक सोडून इतर कोणाचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले नाहीत. जया बच्चन, ऐश्वर्या राय व मुलगी आराध्या या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट मध्ये असे सांगितले, “माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मला रुग्णालयात भरती करण्यात आलंय.” तसेच अभिषेकने देखील ट्विट करताना फॅन्सला शांत राहा व घाबरु नका असे आव्हान केले आहे. या दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असला तरी त्यांना कोरोनाची खूप सौम्य लक्षणे आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *