सगळीकडे कोरोनामुळे मृत्यूचे तांडव चालू असताना एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुःखद अंत झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर शहरातील असून पत्नी व दोन मुलांना संपवीत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.

amol jagtap news


भेटलेल्या माहितीनुसार, मयत अमोल जगताप हा पत्नी व दोन लहान मुलांसोबत सोलापूर येथील पुणे नाका परिसरातील हांडे प्लॉट येथे भाड्याने राहत होते. सोमवार दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली असून अमोल जगताप(वय 35) यांनी पत्नी मयुरी(वय 27), मुलगा आदित्य (वय 7) व आयुष (वय 4) या तिघांचा अगोदर खून केला. तिघांचा खून करून स्वतः अमोल ने आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली.

अमोल यांचा गॅलेक्सी हॉटेल बीयर बार हा व्यवसाय होता. परंतु खाजगी सावकाराचा कर्जाचा बोजा सहन न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे एका पत्रात लिहून ठेवले होते. एकाच घरातील चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण सोलापूर शहर हादरले आहे.


घटनास्थळी पोलिस आयुक्त यांनी घटनास्थळी भेट दिली असताना अमोल व दोन लहान मुलांचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून अाला, तर पत्नी पलंगावर मृत अवस्थेत पडलेली दिसून आली. पोलिसांचा या प्रकरणातील पुढील तपास चालू आहे.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *