अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाला कोरोना झालेली बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता अनुपम खेर यांच्या घरातून वाईट बातमी आली आहे. अनुपम खेर यांच्या घरातील काही सदस्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

anupam kher


स्वतः अनुपम खेर यांनी व्हिडिओद्वारे फॅन्स ला माहिती दिली आहे. व्हिडिओ मध्ये माहिती देताना अनुपम खेर यांनी त्यांची आई, त्यांचा भाऊ, वहिनी व पुतणी यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. अगोदरच बच्चन कुटुंबाचे काळजी असताना आता अनुपम खेर यांच्या परिवाराची काळजी फॅन्सला लागली आहे.

anupam kher


परिवारातील सदस्यांना जरी कोरोना झाला असला तरी अनुपम खेर यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे फॅन्स मध्ये समाधानाची गोष्ट आहे. अनुपम खेर यांच्या आईला कोकिलाबेन दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

anupam kher

स्वतः अनुपम खेर यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की “माझ्या आईला काही दिवसापासून भूक लागत नव्हती, त्यामुळे आम्ही टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. तसेच माझ्यासोबत माझा भावाच्या परिवाराला टेस्ट करण्यास सांगितले. आई सोबतच भाऊ राजू व त्याची पत्नी तसेच, त्यांची मुलगी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असून त्यांना सौम्य प्रकारची कोरोनाची लागण आहे. सुदैवाने माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.” असे सांगताना फॅन्स नी स्वतःची काळजी घेण्याचे त्यांनी आव्हान केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *