गेल्या काही महिन्यांपासून मराठी कलाकारांच्या साखरपुड्याच्या व विवाहाच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. नेहा पेंडसे व शर्मिष्ठा राऊत यांनी लग्न केले तर सोनाली कुलकर्णी हीचा साखरपुडा झाला. आता या यादीत आणखीन एका अभिनेत्रीचे नाव समाविष्ट झाले आहे.
अर्चना निपाणकर या मराठमोळ्या अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेयर करून फॅन्स ना सुखद धक्का दिला आहे. अर्चानाचा विवाह मोजक्या काही मंडळीच्या उपस्थितीत पार पडला. ती 11 वर्षापासून सहवासात असलेला मित्र पार्थ रामनाथपुर सोबत विवाह बंधनात अडकली. तिच्या लग्नाच्या काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अर्चानाने झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय मालिका “का रे दुरावा” या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाचे पात्र साकारले होते. तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका “राधा प्रेम रंगी रंगली” मधील भूमिकेसाठी लोकांनी तिला खूप पसंत केले.
अर्चनाने नुकताच येऊन गेलेला “पानिपत” या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. या चित्रपटात अर्चनाने राघोबादादा पेशवे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. अर्चनाच्या विवाह सोहळ्याला कोणतेही कलाकार उपस्थित राहू शकले नसले तरी सर्वांनी कमेंटमध्ये तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..