सुशांत सिंग राजपूत या बॉलीवूड अभिनेत्याच्या निधनाला दीड महिना उलटत नाही तोपर्यंतच मराठी अभिनय क्षेत्रातील एका नवोदित अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अशितोष भाकरे असे या अभिनेत्याचे नाव असून त्यांने नांदेड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ashutosh bhakre news


झी मराठीवरील लोकप्रिय मालिका “खुलता कळी खुलेना” या मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुख हीचा अभिषेक हा पती होता. त्याने घेतलेल्या टोकाच्या पावलामुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. आशुतोष ने काही मराठी चित्रपटात देखील काम केले होते. काही दिवसांपूर्वीच आशुतोष ने एका डॉक्टरांचा व्हिडिओ सोशल अकाउंट वर शेयर केला होता, ज्यात त्या डॉक्टरांनी लोक आत्महत्या का करतात, या बद्दल माहिती दिली होती.

ashutosh bhakre news


आशुतोष ची पत्नी मयुरी देशमुख ही एक नावाजलेली मराठी अभिनेत्री असून तीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. दोघांनी 21 जानेवारी 2016 रोजी लग्न केले होते. परंतु आशुतोष ने कोणत्या कारणाने हे मोठे पाऊल उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

आशुतोष भाकरे हा 32 वर्षाचा होता. आशुतोष ने “इचार ठरला पक्का”, “भाकर” अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. सुशांत प्रकरणाला आणखीन यश प्राप्त झाले नाही तोपर्यंतच आशुतोष या अभिनेता ने जीवनयात्रा संपविली. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.

ashutosh bhakre news

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.