बॉलीवूड मधील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच्या फोटो पाहून अनेकांना ओळखणे देखील कठीण जाते. आज आपण बॉलिवुडच्या अशा 5 प्रसिद्ध अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत, ज्या एके काळी खूपच जाड होत्या.
1. अलिया भट्ट : सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याच्या निधनानंतर मागील काही दिवसांपासून नेटकऱ्यानी ट्रोल केलेल्या आलिया भट्ट या अभिनेत्रीचे जुने फोटो पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही. आत्ताच्या सर्वात सडपातळ अभिनेत्री मध्ये आलिया टॉपला येते. परंतु चित्रपटात काम करण्यापूर्वी अलियाचे वजन 67 किलो होते. योग्य डायट प्लॅन आखून अलियाने नंतर जवळपास 16 किलो वजन कमी केले.
2. सोनाक्षी सिन्हा – दबंग चित्रपटातून बॉलीवुड मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही अगोदर खूपच लठ्ठ होती. तीचे वजन जवळपास 90 किलो होते. दबंग चित्रपटासाठी तीने वजन घटविले होते. तीने जवळपास 30 किलो वजन घटविले आहे व आता तीचे वजन 60 किलो आहे. योग्य डाएट आणि व्यायाम करीत तिने हे वजन घटविले.

3. भूमी पेंढनेकर : या अभिनेत्रीने तीच्या वजनाला घेऊन सर्वांनाच चकित केले होते. “दम लगा के हैशा” या चित्रपटासाठी भूमीने वजन वाढून चक्क 89 केले होते. परंतु चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर भूमीने चक्क 32 किलो वजन कमी करुन 57 वर आणले. आत्ताच्या भूमीला पाहून कोणालाही त्या लठ्ठ भूमीवर विश्वास बसत नाही.
4. सारा अली खान – सैफ अली खानची मुलगी साराने “केदारनाथ” चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. परंतु सारा अभिनयाला सुरुवात करण्यापूर्वी खूपच जाड होती. तीचे पूर्वी तब्बल 96 किलो वजन होते. परंतु तीने स्वतःवर मेहनत करून 46 किलो वजन कमी केले व आता तिचे वजन अंदाजे 50 किलो आहे.

5. सोनम कपूर : अनिल कपूरची मुलगी अशी ओळख घेऊन चित्रपटात पदार्पण करणारी सोनम कपूर देखील अगोदर खूप जाड दिसायची. तीचे वजन जवळपास 86 किलो इतके होते. तीचे आता 55 किलो वजन असून तीचा सध्याचा लुक पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही की सोनम इतकी जाड दिसायची. सध्या ती तीच्या सडपातळ शरीरामुळे ट्रोल होत असते.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा .