टिकटॉक या चायनीज ॲप मुळे कित्येक जणांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. काही काही व्यक्तींना अनेक फॉलोवर्स व काहींना यामधून पैसे देखील मिळत गेले. चित्रपटसृष्टीप्रमाणे टिकटॉक वर देखील अनेक स्टार तयार झाले होते. अशाच स्टार पैकी विदर्भातील दिनेश पवार हे देखील होते. टिक टॉक वरील बंदी मुळे दिनेश पवार व त्याच्या दोन बायका यांना खूपच दुःख झाले आहे.
India and Bollywood ❤️ pic.twitter.com/7jK06boqPX
— Bhaiyyaji (@bhaiyyajispeaks) November 13, 2019
केंद्र सरकारने चीन विरुद्ध आक्रमक भूमिका घेताना 59 चीनी ॲप भारतात बंद करण्याचा निर्णय घेतला. या वृत्ताने प्रसिद्धी मिळवलेल्या कलाकारांना खूप दुःख झाले. धुळे जिल्ह्यातील लोकप्रिय टिकटॉकर दिनेश पवार हे आपल्या दोन्ही बायकांसोबत व्हिडिओ बनवीत असत. 90 च्या दशकातील बनवलेले त्यांचे टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते.
प्रसारमाध्यमांनी देखील दिनेश पवार यांचे चांगलीच दखल घेतली होती. यामुळेच दिनेश व त्याच्या दोन पत्नींना प्रसिद्धी मिळाली होती. टिकटॉक बंदी वर बोलताना दिनेश म्हणाले, “आम्ही निराश झालो, परंतु आम्हाला जाणीव आहे की यामुळे फक्त आम्हीच निराश झालो नाही, आमच्यासोबत लाखो लोक निराश झाले आहेत. हा निर्णय ऐकून माझ्या दोन्ही पत्नी ढसाढसा रडल्या. परंतु आता आम्ही युट्युब कडे जाण्याचा निर्णय घेत आहोत.”
सर्वत्र अशी अफवा होती की दिनेश पवार यांना टिकटॉक मुळे आजपर्यंत 30 लाख रुपये मिळाले आहेत. परंतु दिनेश पवार यांनी ही फक्त अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांना टिकटॉक मधून काहीही मिळाले नाही परंतु प्रसिद्धीची हाऊस त्यांना होती व ती पूर्ण झाली होती, असं त्यांनी म्हटलं.
माहिती share नक्की करा…