भारत-चीन बॉर्डरवर दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या वादाचे पडसाद भारतात उमटत आहेत. सर्वत्र चीन संबंधित सर्व गोष्टींचा बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. चिनी मालाचा तसेच चिनी ॲप्स वर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडिया वरून होत होती. यामुळेच भारत सरकारने धाडसी निर्णय घेताना चीनच्या 59 ॲप्स वर भारतात बंदी घातली आहे.
59 ॲप्समध्ये टिक टॉक या लोकप्रिय ॲपचा देखील समावेश होता. टिक टॉक वर बंदी घातल्यानंतर अनेक युवा पिढी रोजगार एका रात्रीतच बंद झाले आहे. त्यामुळे काही फेमस टिक टॉक स्टार नाराज झाले असणार, हे नक्की. टिक टॉक मधून प्रसिध्दी मिळवणाऱ्या फैसल शेख हा किती कमवायचा हे जाणून घेऊयात.
2 डिसेंबर 1997 रोजी मुंबई मध्ये जन्मलेल्या फैसल ला मिस्टर फैसू या नावाने देखील ओळखतात. 23 वर्षीय या युवा कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्याने टिक टॉक वर व्हिडिओ पोस्ट करून प्रसिध्दी मिळवली होती. मिळालेल्या माहितीनुसार फैसल हा महिन्याला 4-5 लाख रुपये कमवायचा. म्हणजेच एका वर्षाचे त्याचे उत्पन्न जवळपास 40 ते 50 लाख असे होते.
फैसलचे जवळपास 30 मिलियन म्हणजेच 3 करोड इतके फॉलोवर्स होते. टिक टॉक मुळेच त्याला काही अल्बम साँग मध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली होती. इंस्टाग्राम वर देखील फैसल चे जवळपास 1.2 करोड फॉलोवर्स आहेत. फैसल सोबतच जन्नत जूबैर, अवनीत कौर, रियाज अली, अर्शिफा खान, विष्णूप्रिया यांचे टिक टॉक पासून मिळणारे उत्पन्न देखील बंद झाले आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..