सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतल्यानंतर सिनेजगतात खळबळ माजली होती. सुशांतच्या निधनाला दीड महिने उलटले असले तरी त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न अजूनही तसाच राहिला आहे. मुंबई पोलीस सुशांत संबंधित प्रत्येक व्यक्तींची चौकशी करीत आहेत. परंतु आता सुशांत चे वडील कृष्णा सिंग यांनी काही लोकांवर गंभीर आरोप लावले आहेत.

fir on filed on rhea


सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवीत कृष्णा सिंग यांनी काही व्यक्तींवर पाटणा पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे पाटण पोलीस स्टेशन मधील चार पोलिसांची तुकडी अटक करण्यासाठी मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी मुंबईला रवाना झाली आहे.

fir on filed on rhea

संभाव्य व्यक्तींमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती चे देखील नाव आहे. कृष्णा सिंग यांनी रिया चक्रवर्ती वर सुशांतच्या बँक अकाउंट मधून 17 कोटी उचलल्याचा आरोप केला आहे. तसेच अन्य काही फिल्मी जगतातील लोक देखील सुशांतच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे कृष्णा सिंग यांनी आरोपात म्हटले आहे.

fir on filed on rhea


सुरुवातीपासूनच रिया चक्रवर्ती वर अनेकजण आरोप लावताना दिसले होते. आता सुशांतच्या वडिलांनी घेतलेल्या पावलामुळे नेमके काय सत्य समोर येईल, हे पाहुयात. या अगोदर सुशांत सिंग राजपूत प्रकरणासाठी बिहार मधील जनतेकडून तसेच देशभरातून सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती.

fir on filed on rhea

माहिती आवडली तर शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *