एखाद्या कलाकाराच्या अंगी एकापेक्षा जास्त कला अवगत असतील तर ते नक्कीच लोकप्रिय होवू शकतात. अभिनय क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयासोबतच उत्कृष्ट गायन देखील करू शकतात. मराठी इंडस्ट्री मध्ये प्रशांत दामले, सचिन पिळगावकर, केतकी माटेगावकर असे अनेक कलाकार अभिनयासोबतच गायन देखील सुरेल करू शकतात.
आता झी मराठीवरील “माझा होशील ना?” या मालिकेतून पदार्पण करणाऱ्या गौतमी देशपांडे हिच्या आवाजाची सर्वत्र चर्चा होत आहे. या मालिकेत गौतमी ने सई बिराजदार हे पात्र साकारले आहे. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची सख्खी बहीण आहे. अभिनया सोबतच गौतमीला गाणे गाण्याची खूप आवड आहे.
गौतमीचा जन्म 31 जानेवारी 1992 रोजी पुणे येथे झाला. तीचे सर्व शिक्षण पुण्यातच झाले. गौतमी खरे तर एक प्रोफेशनल गायिका आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तीने गायनाचे धडे देखील घेतले आहेत. ती सोशल मीडिया अकाऊंट वर नेहमी तिच्या गाणे गायलेले व्हिडिओज पोस्ट करताना दिसत असते. आता तिचा “पांडुरंग कांती” हे भक्तीगीत गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ..
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.
Composite Start –>