गेली साडेतीन महिने लॉकडाऊन मुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण बंद होते. लॉकडाऊन काढल्यानंतर मालिका परत एकदा सुरु करण्यात आल्या. झी मराठी वाहिनीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेतील कलाकार डॉ. गिरीश ओक हे सध्या एका कमेंट मुळे चर्चेत आले आहेत.
या मालिकेतील बबड्या नावाचे पात्र प्रेक्षकांना आवडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकजण या मालिकेला ट्रोल करीत आहेत. या ट्रोलींगला कंटाळून गिरीश ओक यांनी चक्क एका फेसबुक युजरच्या पोस्ट कमेंट करून संताप व्यक्त केला.
निशा नामक एका महिलेने अग्गबाई सासूबाई मालिके संदर्भात एक पोस्ट केली. ज्यात त्यांनी “आम्ही तुमच्या मालिकेला प्रसिध्दी मिळवून देत आहोत, आम्हाला पार्टी द्या आणि पुरस्कार सोहळ्यासाठी आमच्यासाठी काही खुर्च्या राखीव ठेवा” असे लिहिले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश ओक यांनी रागात कमेंट केली.
गिरीश यांनी ट्रोल करणाऱ्या त्या महिलेला चांगलेच सुनावले. “तुमचा वेळ जात आहे ना? मग झाल तर त्यातच पार्टी, राखीव खुर्च्या हे जरा जास्तच होत आहे. उलट तुम्ही आम्हा कलाकारांचे आभार मानायला हवे. काहीही(बुध्दी) खर्च न करता वेळ जात आहे तुमचा. तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही जीवावर उदार होवून रोज शूटिंग ला जात असतो.” अशी कमेंट गिरीश ओक यांनी केली.
या कमेंट मुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. कोणी गिरीश ओक यांच्या कमेंटच्या समर्थनात आहेत तर काही जण त्यांना ट्रोल करीत आहेत. असे असले तरी आता मालिकेत मोठे बदल दिसणार आहेत. आसावरीला आता बबड्या विरोधात उभे राहिलेले दाखविण्यात येणार आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..