व्हिडिओ साठी खाली पाहा
झी मराठी वरील प्रसिद्ध मालिके पैकी 1 असणारी “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेने महाराष्ट्र भर प्रसिद्धी मिळवली. कारण या मालिकेत नेहमीच काही ना काही बदल करण्यात आले. व त्याच बदलांमुळे मालिकेने नेहमीच टीआरपीचे रेकॉर्ड प्रस्थापित केले.
आता सध्या मालिकेत आणखीन एक नवीन बदल होताना दिसणार आहे. मालिकेतील महत्त्वाचे पात्र शनया ही परत एक वेळेस बद्दल झालेली दिसणार आहे. आता पहिली शनया म्हणजेच “रसिका सुनील” ही अभिनेत्री इशा केसकरची जागा घेताना दिसून येणार आहे. मालिकेच्या सुरुवातीला रसिका नेच शनया ची भूमिका साकारली होती.
हा बदल का करण्यात आला असा प्रश्न प्रत्येक फॅन्सना पडला होता. त्याचे उत्तर ईशा केसकर हिने स्वतः व्हिडिओ पोस्ट करून दिले आहे. मालिका सोडण्या मागे कोणासोबत कसलाच वाद नव्हता, हे मात्र स्पष्ट झाले आहे.
रसिका प्रमाणेच प्रेक्षकांनी ईशाला देखील तितकेच प्रेम दिले होते. मालिकेतून शनया हे पात्र निघून गेलेले दाखविण्यात आले होते. आता मालिकेची शूटिंग सुरेक्षेच्या कारणास्तव नाशिक येथे सुरू झाली आहे. ईशा ने मालिकेतून का माघार घेतली? पाहा व्हिडिओ..
माहिती share नक्की करा..