काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हीचा साखरपुडा झाला होता. आता महाराष्ट्राची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाड हिचा साखरपुडा लवकरच होणार आहे. सारेगमप लिटल चॅम्प्स या गायनाच्या स्पर्धेतून प्रसिध्दी मिळविणारी कार्तिकी कोणासोबत साखरपुडा करणार आहे हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Kartiki gaikwad engagement


झी मराठीवरील सारेगमप लिटल चॅम्प्स 2008 च्या पर्वात कार्तिकी विजेती झाली होती. त्यावेळी कार्तिकी फक्त नऊ वर्षाची होती. कार्तिकी नी गायलेली गाणी प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये ऐकायला मिळत होती. आता कार्तिकी 21 वर्षाची झाली असून तिचा साखरपुडा येता 26 जुलैला होणार आहे.

Kartiki gaikwad engagement


कार्तिकीचा साखरपुडा पुण्यातील रोनित पिसे याच्याशी होणार आहे. रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. कार्तिकीचे अरेंज मॅरेज अजून रोनित हा तिच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. रोनित संगीत क्षेत्रात देखील उत्तम असून त्यांनी तबल्याच्या तीन परीक्षादेखील केली आहे.

Kartiki gaikwad engagement

सारेगमप नंतर कार्तिकीने अनेक मराठी गाणी गायली आहेत. त्यातच मराठी भक्तीगीत तीने जास्त गायली आहेत. सध्या ती झी टॉकीज वरील गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घरी बसूनच करीत आहे. साखरपुड्याची तारीख नक्की झाली असली तरी आणखीन लग्नाची तारीख कार्तिकीने सांगितले नाही. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Kartiki gaikwad engagement

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *