यंदा सर्वत्र कोरोना व्हायरस मुळे लॉकडाउन केल्याने लग्नाची धूम धाम दिसून आली नाही. काही ठिकाणी लग्नासाठी परवानगी देण्यात आली नाही, तर काही ठिकाणी नियमांतर्गत लग्न करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच “लागीर झालं जी” या मराठी मालिकेच्या एका सदस्याचा नुकताच विवाह संपन्न झाला आहे.
झी मराठीवरील लागीर झालं जी मालिकेचे लेखक व क्रिएटिव्ह हेड तेजपाल वाघ यांचा काल विवाह संपन्न झाला. हा विवाह सोहळा जवळचे नातेवाईक व काही मोजक्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थित सातारा जिल्ह्यातील वाई येथे पार पडला. या विवाह सोहळ्याला लागिर झालं जी मालिकेतील काही मोजके कलाकार देखील उपस्थित होते.
आपल्या उत्तम लेखणी मधून लागीर झालं जी सारखी सुप्रसिद्ध मालिका बनविणाऱ्या तेजपाल वाघ यांचा किरण घाडगे यांच्यासोबत विवाह झाला. तेजपाल वाघ यांच्या लग्नाला निखिल चव्हाण, महेश जाधव, राहुल मगदूम, पूर्वा शिंदे, किरण गायकवाड या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. मालिकेत अज्या आणि शितलीचा अभिनय करणारे नितीश चव्हाण व शिवानी बावकर हे मात्र लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत.
तेजपाल वाघ यांनी लेखना सोबतच अभिनय क्षेत्रात देखील काम केले आहे. पळशीची पी टी, निशाणी डावा अंगठा, नशीबवान, टी टी एम एम अशा अनेक चित्रपटात तेजपाल ने अभिनय कौशल्य देखील दाखविले आहे. तेजपाल वाघ आणि किरण घाडगे यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा.