लग्नबंधनात अडकण्याचा साठी मुलगा व मुलीच्या जन्मपत्रिकेतील गुण जुळतात का ते पाहतात, ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. परंतु एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे ज्यात प्रेमविवाह केलेल्या जोडप्याला बारावी परीक्षेतील गुण देखील जुळले आहेत.

love couple same hsc marks


ही घटना सातारा जिल्ह्यातील असून गणेवाडी- ठोमसे या गावातील नवविवाहित जोडप्याचा मे महिन्यात लॉकडाऊन मध्ये विवाह झाला होता. पाटण तालुक्यातील गणेवाडी- ठोमसे या गावातील अधिक कदम या मुलाचा सांगवड येथील किरण सुर्यवंशी या मुलीसोबत सर्वांच्या संमतीने प्रेमविवाह झाला.

love couple same hsc marks

या दोघांचे लग्न पत्रिकेतील 36 पैकी 23 गुण जुळले होते. या वर्षी अधिक याने कला शाखेतून परीक्षा दिली व किरण हिने वाणिज्य शाखेतून परीक्षा दिला. दोघांचा निकाल ज्यावेळी हाती आला तेंव्हा चमत्कारच घडला. दोघांनाही परीक्षेत समान गुण पडल्याचे निदर्शनास आले.

love couple same hsc marks


अधिक व किरण यांना बारावी परीक्षेत 650 पैकी 323 गुण भेटले असून दोघांची टक्केवारी 49.69 अशी आहे. अधिक ने मुक्त विद्यापीठातून यापूर्वीच पदवी प्राप्त केली होती. परंतु किरण साठी त्याने परत परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या मार्क्स बद्दल सर्वत्र चर्चा होत आहे.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *