2020 मध्ये अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतलेले आपण ऐकत आहोत. बॉलिवूड नंतर आता मराठी अभिनय क्षेत्रातील एका उत्तम कलाकाराने जगाचा निरोप घेतला आहे. झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील एका कलाकाराच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत राधिका गुरुनाथ ज्या सोसायटीमध्ये राहायचे देतील वॉचमनची भूमिका साकारणारे विजय वीर यांचे निधन झाले आहे. काल दिनांक 20 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता विजय वीर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही बातमी ऐकून मालिकेतील अन्य कलाकारांना धक्का बसला आहे.
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत वॉचमनची भूमिका उत्तमरित्या साकारले व प्रेक्षकांनी त्या पात्राला पसंद पण खूप केले. या मालिके सोबत विजय यांनी लक्ष्य, रुद्रम, रंग माझ्या वेगळा या मालिकेत देखील उत्तम अभिनय केला आहे. सध्या चालू असलेली कलर्स वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेत ते हवालदार माने काका यांची भूमिका साकारत होते.
शनायाची भूमिका साकारणारी ईशा केसकर हिला देखील ही बातमी ऐकून धक्का बसला आहे. वांग्णी, मनोरी, वाडा या शॉर्ट फिल्म मध्ये देखील विजय वीर यांनी काम केले आहे. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्राने एक उत्तम अभिनेता गमावला आहे. मर्द मराठी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.