माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीवरील मालिकेने लोकप्रियतेचे अनेक शिखरे गाठली. महाराष्ट्रातून सर्वत्र या मालिकेला प्रेम मिळाल्याने अनेक टीआरपी चे रेकॉर्ड मोडून काढले. या मालिकेत जेंव्हा जेंव्हा एखादा बदल करण्यात आला तेंव्हा तेंव्हा मालिकेचा टीआरपी वाढला आहे.
नेहमीप्रमाणेच याही वेळेस मालिकेत मोठा बदल करण्यात येत आहे. शनया नावाचे हे पात्र आता परत एकदा बदलण्यात येणार आहे. शनाया हे मालिकेचे मुख्य पात्र यापूर्वीही बदलण्यात आले होते. त्यावेळी रसिका सुनील या अभिनेत्रीला परदेशात जावे लागत असल्याने मालिकेतून बाहेर पडावे लागले होते व तिची जागा इशा केसकर या अभिनेत्रीने घेतली होती.
सुरुवातीला ईशा केसकर म्हणून पाहण्यासाठी प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली होती. परंतु कालांतराने ईशा देखील उत्तम अभिनय करू लागली होती. लॉकडाउन काढल्यानंतर मालिकांचे शूटिंग परत सुरू झाले असून माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत आता पहिलीच शनया दिसून येणार आहे.

म्हणजेच, आता मालिकेत “रसिका सुनील” हीच परत शन्याचे पात्र साकारताना दिसणार आहे. रसिकाला शन्या हे पात्र छान साकारता येते, असे अनेक प्रेक्षकांचे म्हणणे होते व प्रेक्षकांची ही इच्छा मालिकेने पूर्ण केली. मालिकेत आता सौमित्र आणि शन्या मध्ये काहीतरी ट्विस्ट दाखविण्यात येणार आहे. काहीही असो यामुळे मालिकेचा टीआरपी वाढणार, हे नक्की.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा