श्रावण मासाला प्रारंभ झाल्यास सर्व सणा समारंभाला देखील सुरुवात होते. दिनांक 25 जुलै रोजी देशभरात देशभरात सर्वत्र नागपंचमी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी अनेक ठिकाणी लॉकडाउन असल्याने सर्वत्र तितका उत्साह दिसणार नाही. परंतु घरी बसूनच नागपंचमीला कशाप्रकारे पूजा करावी, याबद्दल माहिती वाचा.

१. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करा आणि आंघोळ करा.
२. यानंतर प्रसादासाठी शेवयाची खीर आणि तांदळाचा भात बनवा.

Nagpanchami pooja vidhi


३. लाकडी पाटा किंव्हा चौरंग वर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड घाला आणि त्यावर नागदेवताची मूर्ती किंवा फोटो ठेवा.

Nagpanchami pooja vidhi


४. मूर्ती किंवा फोटोवर पाणी, फुले फळे आणि चंदन लावा

५. त्याला दुध, दही, तूप, मध आणि पंचामृत ने अंघोळ घाला आणि नंतर आरती करा.

Nagpanchami pooja vidhi

६. पूजा केल्यानंतर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर शेणाने सर्पाच्या आकार बनवा आणि कवड्या काढा व त्यावर खीर अर्पण करा. हे सवे केल्याने आपले घर वाईट शक्तींपासून सुरक्षीत राहील आणि लक्ष्मीचे घरात आगमन होईल.

Nagpanchami pooja vidhi

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *