भारत सरकारने आर्थिक परिस्थिती बिकट होवू नये यासाठी “अनलॉक”ची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातच टीव्ही मालिकांचे चित्रीकरण काही नियमांतर्गत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तरी पण आणखीनही रेड झोन मध्ये चित्रीकरण करण्यास पोलिसांकडून प्रतिबंध घालण्यात येताना दिसत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून टीव्ही मालिकांचे शूटिंग सुरू झालेले दिसून येत आहे. मात्र शूटिंग करताना कलाकारांना व अन्य स्टाफला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कलाकार व अशा स्टाफ लोकांना कोरोनाचे संक्रमण धोका वर्तविण्यात येत होता. अशातच एका अभिनेत्रीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे.
तेलगू मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री “नव्या स्वामी” हिचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एक जुलै रोजी नव्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. गेल्या दहा दिवसापासून ती शूटिंग करीत होती व त्याच दरम्यान तिला अशक्तपणा व डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. परंतु तरीही तिने शूटिंग थांबविले नाही.
स्वतःला जास्त त्रास होत असल्याने तिने शेवटी डॉक्टरांकडे तपासणी केली व त्यात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. रिपोर्ट पाहताच नव्याला अश्रू आवरता आले नाहीत. शूटिंग ला जाण्याची घाई केली, याची तीला आता खंत वाटते. ती सेटवर कोणाकोणाच्या संपर्कात आली होती हे आणखीन समजू शकले नाही.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा