प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनस नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टी साठी चर्चेत असतात. प्रियंका ही निक सोबत लॉकडाऊन मध्ये अमेरिकेत राहत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत प्रियंका चोप्राने तिचे आणि तिच्या पतीचे बेडरूममधील गुपित उघडपणे सांगितले होते. त्याच वेळी प्रियांकाने हे देखील सांगितले होते तिचा नवरा निक त्या गोष्टी शिवाय जगू शकत नाही.
प्रियंकाने मुलाखतीत सांगताना, “जेव्हा निक सकाळी उठतो त्यावेळी त्याला तो पहिल्यांदा माझा चेहरा पाहण्याचा हट्ट करतो. त्याला मी म्हणते एक मिनिट थांब मला मॉइश्चरायझर लाऊ दे. परंतु निक ला मी झोपेतून उठलेला चेहराच छान वाटत असतो. पती पत्नीचे नाते कोणत्याही बंधनाशिवाय एकमेकांवर प्रेम करावे असे असावे,” असे देखील प्रियंकाने म्हटले.
प्रियंकाने त्यांच्या नात्याबद्दल सांगताना म्हटले, आमच्या दोघांचा एक नियम आहे की आम्ही दोघे दहा दिवसांपेक्षा जास्त एकमेकांना बघितल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या दोघांचे करीयर वेगळे असले तरी आम्ही जगात कुठेही असलो तरी भेटण्याचा प्रयत्न करीत असतो. दोघांनी लवकरच फॅमिली प्लॅनिंग करण्याचा विचार असल्याचे प्रियंकाने सांगितले.
प्रियंका आणि निक ने 1 आणि 2 डिसेंबर 2018 रोजी राजस्थान मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. पहिल्यांदा हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे व दुसऱ्यांदा ख्रिश्चन धर्मांतर्गत विवाह झाला होता. या दोघांच्या जोडीला अनेकांनी खिल्ली उडवली असली तरी अनेक जण या दोघांना आदर्श मानतात.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा..