व्हिडिओ साठी खाली पाहा..
टेलिव्हिजनवर इंटीमेट सीन दाखवणे हे दिग्दर्शकासाठी नेहमीच आव्हानात्मक गोष्ट असते. अशा सीन मुले मालिकेला प्रसिध्दी तर मिळतेच पण त्याचबरोबर टीका देखील सुरू होत असतात. सोनी टेलिव्हिजन या वाहिनीवर गाजलेली मालिका “बडे अच्छे लगते है” या मालिकेत ही असाच एक सीन दाखविण्यात आला होता.
या मालिकेत राम कपूर व साक्षी तन्वर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या जोडीला त्या काळात लोकांनी खूपच पसंद केले होते. परंतु एका एपिसोड मधील तो 17 मिनिटाचा इंटीमेट सीन मुळे मालिका चांगलीच चर्चेत आली होती.
यापूर्वी कोणत्याही मालिकेत इतके बोल्ड सीन दाखविण्यात आले होते. मालिकेच्या सुरुवातीला राम आणि साक्षी मध्ये जराही चांगले संबंध नसल्याचे दाखविण्यात आले व नंतर मालिकेत दोघांना प्रेम झालेले दाखविले.
प्रेम झाल्यानंतर दोघांमधील तो सीन खूपच चर्चेचा विषय ठरला. सर्व कुटुंब एकत्र मालिका पाहत असतात, त्यामुळे या सीन वर अनेकांनी आक्षेप घेतला होता. मालिकेची निर्माती एकता कपूर हिने देखील एका मुलाखतीत हा सीन दाखवून चूक केल्याची कबुली दिली होती. राम कपूर आणि साक्षी तन्वर नंतर “करले तू भी मोहब्बत” या वेब सिरीज मध्ये एकत्र दिसून आले होते.