बॉलिवूडचा लोकप्रिय कपल्स पैकी एक म्हणजेच दीपिका पदुकोण व रणवीर सिंग हे होय. या दोघांनीही चित्रपट सृष्टीत स्वतःच्या मेहनतीने यश प्राप्त केले. लग्न पूर्वीची दोघांची लव स्टोरी खूप चर्चेचा विषय बनला होता. सर्व चर्चांना पूर्णविराम देत दोघांनी 14 नोव्हेंबर 2018 रोजी विवाह केला होता.
रणवीर सिंग हा दीपिका पूर्वी अनुष्काला देखील डेट करीत होता, अशी देखील चर्चा रंगली होती. खूप कमी लोकांना माहिती आहे की रणवीर दीपिका व अनुष्का पूर्वी एका मुलीच्या प्रेमात खूप वेडा होता. चंचल स्वभावाचा असणारा रणवीर नेमके कोणत्या मुलीच्या प्रेमात वेडा होता, ते जाणून घेऊयात.
रणवीर कॉलेजमध्ये शिकत असताना प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र व हेमामालिनी यांची मुलगी “अहाना देओल” हीचा प्रेमात पडला होता. रणवीर ने स्वतः “कॉफी विथ करण” या शोमध्ये याचा खुलासा केला होता. दोघांचे पाच वर्षे प्रेम प्रकरण देखील चालू होते. पुढे रणबीरने दोघांच्या ब्रेकअप चे कारण देखील सांगितले होते.
कॉलेजमध्ये शिकत असताना सध्याचा अभिनेता आदित्य रॉय कपूर हा कॉलेजमध्ये खूप प्रसिद्ध होता. अहाना देखील नंतर त्याच्यासाठी खूप वेडी झाली होती. त्यामुळे आदित्य रॉय कपूर मुळेच अहाना आणि रणवीरचे ब्रेकअप झाले होते. अहाना व आदित्यचे नंतर प्रेम प्रकरण सुरू राहिले व त्यांचे ब्रेकअप देखील झाले. आता अहाना विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे.
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा