व्हिडिओ साठी खाली पाहा..
कोरोना या भयानक रोगामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची लागण झालेले अनेक जण या रोगाला मात करीत घरी पोहचलेले आपण पाहिले आहेत. या व्हायरस पासून सुटका होणे, ही घरच्यांसाठी एक आनंदाची बातमी असणे साहजिकच आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात कोरोना वर मात करून एक महिला घरी आल्यास तीचे दमदार स्वागत करण्यात आले. ती ज्यावेळी घराजवळ येते त्यावेळेस “टाय टाय फिश” या गाण्यावर बेधुंद डान्स करताना दिसत आहेत.
सदर व्हिडिओ पुण्यातील आंबेगाव पठार मधील स्वामी समर्थ नगर मधील आहे. हा व्हिडिओ सातपुते कुटुंबाचा असून व्हिडिओ मध्ये पेशंटच्या घरातील मुलीने नाचून स्वागत केलेच, परंतु ज्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती तीने देखील गाण्यावर ताल धरला. कोरोना सारखे कितीही रोग आले तरी अशा रोगांवर आम्ही मात करू शकतो, असेच या व्हिडिओला पाहून वाटते.
काल पुण्याजवळील तर एका गावात सरपंचाचे डिजे लावून स्वागत केले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या अगोदरही कोरोना पेशंटचे घरातील व कॉलनी मधील सर्वांनी स्वागत केलेले व्हिडिओ पाहिले आहेत. पण या दोघींनी केलेला डान्स ची सध्या सोशल मीडियावर चर्चा चालू आहे.
पाहा व्हिडिओ