2020 हे वर्ष खरेच प्रत्येक गोष्टीत वाईट होत चालले आहे. एकीकडे कोरोनाची महामारी तर दुसरीकडे बॉलिवूड जगतातून एका पेक्षा एक उत्तम कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. ऋषी कपूर, इरफान खान, वाजीद खान, सुशांत सिंग राजपूत या दिग्गजांच्या निधनानंतर आता नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन झाले आहे.
वयाच्या 72 व्या वर्षी सरोज खान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अठरा दिवसापूर्वीच सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाबद्दल त्यांनी इंस्टाग्राम वर एक दुःखद पोस्ट केली होती. परंतु अठरा दिवसानंतर त्या स्वतः जगाचा निरोप घेतील हे कोणालाच वाटले नव्हते.
जवळपास दोन हजार गाण्यांसाठी दिग्दर्शन करणाऱ्या सरोज खान यांनी सुशांत सिंग बद्दल पोस्ट करून असे म्हटले होते, “मी तुमच्यासोबत कधी काम केलं नव्हतं, परंतु आपण खूपदा भेटलो होतो. तुमच्या जीवनात असे काय वाईट घडले होते? मला धक्का बसला आहे की तुम्ही असा निर्णय का घेतलात.”
पुढे लिहिताना सरोज नी,”तुम्ही कोण्या तरी मोठ्या व्यक्तीशी त्याबद्दल बोलू शकला असतात, जे तुमची मदत करू शकतात. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो. मला माहिती नाही की तुमचे बहीण वडील आता काय करीत आहेत. या वाईट प्रसंगी देव त्यांना ताकद देवो. मी तुमच्या सर्व चित्रपटाला पसंत केले व कायम तुम्हाला प्रेम करीत राहील.”
माहिती share नक्की करा