भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये सीमेवर सुरू असलेल्या वादांमुळे भारत सरकारने चीनच्या 59 ॲप्स वर बंदी घातली. या 59 ॲप्समध्ये टिकटॉक या ॲपचा देखील समावेश होता. टिक टॉक च्या माध्यमातून स्वतःची व्हिडिओ बनवून अनेक नवख्या कलाकारांना प्रसिद्धी मिळाली होती.

टिकटॉक वर बंदी आणल्याने प्रसिद्धी मिळविलेल्या त्या कलाकारांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये महाराष्ट्राचा सुरज चव्हाण यांचा देखील समावेश आहे. सुरज ने टीप टॉप च्या माध्यमातून स्वतःचे डायलॉग वापरून अनेक व्हिडीओ बनविले होते. त्याच्या व्हिडिओज सोशल मीडिया वरून खूप व्हायरल झाल्या होत्या व जवळपास 15 लाख लोकांनी त्याला फॉलो केलं होतं. टिक टॉक बंदीवर सुरज देखील नाराज झाला झाला असला तरी तो देश हितासाठी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो.

सुरज ने म्हटला, रोज मला हजार रुपये मिळायचे, लोक मला उद्घाटनाला बोलवायचे. पण आता हे सगळं बंद झाला आहे. मी आता युट्युब वर गुलिगत व्हिडिओ बनविणार आहे.” सूरजला घेऊन एक दिग्दर्शक लवकरच वेब सिरीज बनवणार आहे अशी बातमी देखील आहे. पाहा व्हिडिओ मध्ये काय म्हटला सूरजने..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *