सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येला जवळपास पंचवीस दिवस उलटत असले तरी आणखीन सुशांतच्या आत्महत्येचे खरे कारण समजू शकले नाही. पोलीस सुशांत संबंधित प्रत्येक व्यक्तींची कसून चौकशी करीत आहेत. सुशांत हे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले, ज्यात अंकिता लोखंडे, रिया चक्रवर्ती, क्रीती सनोन यांचा समावेश आहे.

सुशांत चे खरे तर अंकिता आणि रिया या दोघी सोबत प्रेम संबंध होते हे सर्वांना माहीतच आहे. सुशांत आणि अंकिताची ओळख “पवित्र रिश्ता” या मालिकेदरम्यान झाली व त्यानंतर दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. दोघांनी जवळपास आयुष्याची 6 वर्षे एकत्र घालविली. दोघे लग्न ही करणार होते परंतु दोघांनी काही कारणास्तव विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

ब्रेकअप नंतरही सुशांत व अंकिता एकमेकांच्या संपर्कात होते. एकमेकांच्या पोस्ट्सला कमेंट्स करून एकमेकांची प्रशंसा करायचे. त्यामुळे अनेक फॅन्सना वाटायचे की दोघांचे प्रेमसंबंध आणखीन चालू आहेत. त्याबद्दल अंकिताला एका मुलाखतीत एक प्रश्न देखील विचारला गेला होता.
यावर अंकिताने खालील व्हिडिओ मध्ये प्रतिक्रिया देताना म्हटले की, “कलाकार म्हणून आम्ही एकमेकांची प्रशंसा करतो. त्यापेक्षा जास्त आमच्यात काही नाही. त्यामुळे फॅन्सनी यावर चर्चा करणे थांबवावे आणि मी या गोष्टींना जास्त सिरीयस घेत नाही. परंतु आम्ही दोघे एकमेकांसोबत बोलत असतो” हे उत्तर ऐकून अंकिता आणि सुशांतचे नाते ब्रेकअप नंतरही चांगलेच होते, असेच दिसते.
पाहा व्हिडिओ