व्हिडिओ साठी खाली पाहा
सुशांत सिंग राजपूत या बॉलीवूड अभिनेत्याच्या निधनाला जवळपास एक महिना उलटत असला तरी त्याच्या फॅन्स वरील दुःखाचे सावट कमी झाले नाही. सुशांत अभिनयासोबतच एक उत्तम व्यक्तिमत्व होता. प्रसिद्धीच्या शिखरावर बसून देखील आपले पाय जमिनीवरच आहेत, असेच तो वागत राहायचा.
सुशांतच्या जाण्यानंतर त्याचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रत्येक क्षण सुशांतने किती आनंद जगला हेच सर्व व्हिडिओ मधून दिसून येत होते. आता सुशांत ची मोठी बहीण श्वेता सिंग हिने सुशांतच्या आयुष्याबद्दल एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये सुशांत एक उत्तम ऑलराऊंडर म्हणूनच जीवन जगा असे दिसून येते. कारण फक्त अभिनय क्षेत्रातच तो परिपक्व नव्हता तर तो प्रत्येक क्षेत्रात निपून होता. श्वेता ही सुशांतची मोठी बहीण असून तिने सुशांत च्या अनेक व्हिडिओला एकत्र करून सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
अभिनयासोबतच सुशांत क्रिकेट, अभ्यास, शूटिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम होता. श्वेताने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून फॅन्स आणखीन एकदा भावूक झाले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ
माहिती share नक्की करा…