14 जून 2020 रोजी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने बांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. आज त्याच्या निधनाला एक महिना उलटत असला तरी आणखीन त्याच्या आत्महत्येचे खरे कारण कळू शकले नाही. त्याच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता व सध्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पूर्णतः उद्धवस्त झाली होत्या.
पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेतून अंकिता आणि सुशांतची ओळख झाली होती. दोघे 6 वर्ष प्रेम बंधनात होते व दोघांनी लग्नाची स्वप्न देखील पाहिली होती. त्यामुळेच सुशांतच्या जाण्याचे जास्त दुःख तिला होणे सहाजिकच आहे. तसेच, रीया चक्रवर्तीवर देखील सुशांतचे प्रेम संबंध असल्याने ती पण दुःखात होती. सोशल मीडियावर अॅक्टिव राहणाऱ्या अंकिता लोखंडे व रिया चक्रवर्ती 14 जून पासून सोशल मीडियापासून दूर होत्या. परंतु आज एक महिन्यानंतर दोघींनी एक पोस्ट केल्या आहेत.
अंकिताने पोस्ट मध्ये एक दिवा लावलेला फोटो टाकला आहे. कॅप्शन मध्ये “चाइल्ड ऑफ गॉड” म्हणजेच “देवाचा मुलगा” असे लिहिले होते. चाहत्यांकडून या पोस्ट बद्दल दुःखद भावना व्यक्त होत आहेत.
अंकिता सारखेच रियाने सुशांतच्या निधना नंतर पहिल्यांदाच पोस्ट केली आहे. रीयाने खूपच भावूक पोस्ट लिहिताना तीच्या मनातील सर्व भावना सुशांत प्रती व्यक्त केल्या आहेत. “आता तुला खूप शांत ठिकाण मिळाले असेल. चंद्र, तारे, आकाशगंगा तुला एक मोठा भौतिकशास्त्रज्ञ म्हणून मिठी मारले असणार. मी तुझ्याकडुन खूप काही शिकले व मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करीत राहीन.”
माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.